Home guard caught on camera assaulting a train manager inside a Mumbai local train, raising serious safety concerns. saam tv
मुंबई/पुणे

तुम्ही रेल्वे वाले, आम्ही लाथ मारून जागा दाखवू; होमगार्डनं धावत्या लोकलमध्येच गार्डच्या मारली लाथ, VIDEO व्हायरल

Home Guard Attacks Train Manager In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये होमगार्डने ऑन ड्युटी ट्रेन मॅनेजरला लाथ मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या होमगार्डनेच चक्क ऑन ड्युटी ट्रेन मॅनेजरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 एप्रिलला रात्री 9.30 च्या सुमारास चर्चगेट - बोरिवली लोकलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर लोकल दादर स्थानकात असताना एक पुरुष होमगार्ड गाडीत चढला. त्यानंतर वांद्रे स्थानकात आणखी तीन होमगार्ड महिला डब्यात शिरले. हे चारही होमगार्ड सांताक्रूझ स्थानकावर महिला डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवाशांच्या चढ उतारात अडथळा निर्माण करत होते.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षितता जपली जावी या हेतूने ट्रेन मॅनेजर मालवदे यांनी त्यांना दुसऱ्या दरवाजाकडे उभे राहण्याची विनंती केली. मात्र या विनंतीचा राग धरून होमगार्ड मनोज सावंत याने उद्धटपणे 'हिरो बनू नकोस, 'आम्हाला शिकवू नकोस, असे म्हणत हुज्जत घातली.

विलेपार्ले स्थानकात राडा आणि मारहाण

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. गाडी विलेपार्ले स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर पोहोचताच संबंधित होमगार्डने आक्रमक पवित्रा घेतला. तुम्ही रेल्वे वाले काहीच नाही, आम्ही तुम्हाला लाथ मारून तुमची जागा दाखवू अशी धमकी देत त्याने मालवदे यांना शिवीगाळ केली. नाव विचारले असता संतापलेल्या मनोज सावंतने ट्रेन मॅनेजरला लाथ मारून शारीरिक मारहाण केली. या घटनेचा वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाने (WRMS) तीव्र निषेध केला आहे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे मारहाण होणे अत्यंत गंभीर असून, संबंधित होमगार्डवर तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून दोषीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT