नगरसेवक नाही प्रोजेक्ट मॅनेजर; पुण्यातील भाजप उमेदवाराचा १०० दिवसांचा प्लॅन ठरला

bjp candidate aishwarya pathare : पुण्यातील भाजप उमेदवाराचा १०० दिवसांचा प्लॅन ठरलाय. त्या १०० दिवस वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत.
bjp candidate aishwarya pathare
aishwarya pathareSaam tv
Published On
Summary

पुणे प्रभाग ३ मधील भाजप उमेदवार ऐश्वर्या पठारे यांनी पुढाकार घेतलाय

निकालाआधीच ‘१०० दिवस, १०० कामे’ उपक्रमाची घोषणा केलीये

शहरी समस्या आणि सुशासनावर विशेष भर दिलाय

पुण्यातील प्रभाग ३ विमाननगर - लोहगाव मधील भाजपची उमेदवार ऐश्वर्या पठारे यांनी निकालाची वाट न पाहता थेट कामांचा आराखडा जाहीर करत पुणे शहराच्या राजकारणात वेगळी छाप पाडली आहे. ‘१०० दिवस, १०० कामे’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला असून शहरी समस्या, सुशासन आणि नागरिकांची जबाबदारी या तीन प्रमुख घटकांच्या आधारित हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रभागाला नगरसेवक नको एक प्रोजेक्ट मॅनेजर हवा असा निर्धार ऐश्वर्या पठारे यांनी केला आहे. पठारे या आय टी इंजिनियर असून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं असून समाज कल्याणासाठी त्यांनी आता पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे. ऐश्वर्या पठारे या पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी आहेत.

bjp candidate aishwarya pathare
प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवत असलेल्या ऐश्वर्या पठारे यांचा ‘१०० दिवस, १०० कामे’ या उपक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून प्रेरणा घेत त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, "विमाननगर लोहगाव भागात निधी आला खरा पण त्याचा वापर नागरिकांसाठी झाला नाही. अनेक वचने स्थानिकांना देण्यात आले होती मात्र विकास फक्त कागदावर राहिला. १०० दिवसांचा आराखडा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेरणा घेऊन आम्ही ठरवला आहे. मूलभूत तसेच तात्काळ लागणाऱ्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोहचवणे तसेच काही "लाँग टर्म" धोरणं सुद्धा या प्रभागासाठी आखली आहेत. आम्ही ४ उमेदवार म्हणजे एका गाडीचे ४ चाकं आहोत. आमचा एकसंधपणा हीच आमची शक्ती आहे."

"१०० दिवसांच्या या उपक्रमात वॉर्ड ऑडिट व नागरिकांशी संवाद, तक्रारी आणि समस्या संकलित करणे, वॉर्ड स्थिती अहवाल तयार करणे, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, पथदिव्यांची आणि फुटपाथ ची दुरुस्ती, महिला सुरक्षा, रस्ते, पाणी यासारखे अनेक विषयात काम करण्याचा निर्धार आहे. प्रभागासाठी पारंपरिक नगरसेवकाची भूमिका मी निभावणार नाही. उत्कृष्ट प्रोजेक्ट मॅनेजरप्रमाणे नियोजन, अंमलबजावणी आणि परिणाम या तिन्ही गोष्टींवर भर देणार आहे. जनतेच्या मतांसोबत आमच्यावर विश्वास दाखवेल आणि तो आम्ही सार्थ ठरवू," असं पठारे म्हणाल्या.

भाजपचा मास्टरस्ट्रोक! पती पत्नीचा एकत्र प्रचार

वडगाव शेरी, लोहगाव-विमाननगर या परिसरात आयटी क्षेत्रात काम करणारा उच्चशिक्षित मतदारवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर गावकी-भावकीचे स्थानिक राजकारणही येथे प्रभावीपणे दिसून येतं. भाजपचा "मेगा प्रवेशात" राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी हाती कमळ घेतलं. या नंतर तात्काळ ऐश्वर्या पठारे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्वतःच्या ताकदीवर पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळवलं. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून यंदाच्या निवडणुकीत नात्यागोत्यांच्या जोड्यांमुळे राजकीय मैदान अधिकच रंगतदार झालं आहे. एका बाजूला प्रभाग ३ मधून ऐश्वर्या आणि प्रभाग ४ मधून सुरेंद्र हे दाम्पत्य एकत्र प्रचार करताना अनेक वेळा पाहायला मिळतं.

स्मार्ट प्रचाराचा अनुभव आला कसा?

उच्च शिक्षित उमेदवार म्हणून ओळख असलेल्या ऐश्वर्या अतुल पाटील यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करत एम आय टी मधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. फेसबुक, निसान यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अशा महत्त्वाच्या विभागात आयटी इंजिनिअर म्हणून काम केलं. २०१४ साली महाराष्ट्र युवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आयटी क्षेत्रात स्थिरावलेली कारकीर्द असताना त्यांनी राजकारणात एन्ट्री केली.

सात महिन्यांपूर्वी त्यांचं आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्याशी विवाह झाला आहे. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापू पठारे यांच्या कामाचा सगळा "बॅकएंड" त्यांनी सांभाळला होता. बापू पठारे यांच्या विधासनभा निवडणुकीचा प्रचाराची सगळी रणनीती ऐश्वर्या आणि त्यांच्या टीम ने तयार केली होती. "कधीच कोणावर टीका न करता, स्वतःच्या कामाची रेष वाढवण्याचा" प्लॅन त्यांनी बापू पठारे यांच्या विजयातून पूर्ण केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान आलेला अनुभव आणखी वाढला आणि त्यांनी थेट महानगरपालिका निवडणूक रिंगणात उतरायचं ठरवलं.

bjp candidate aishwarya pathare
परळीत शिंदे-मुंडेंची MIM सोबत युती; भाजपनंतर शिंदे-मुंडेंचा MIMसोबत घरोबा, VIDEO

आयटीचा अनुभव, समाजकारणाची पार्श्वभूमी आणि प्रशासनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘आयटी मॉडेल कारभार’ ही संकल्पना मतदारांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रभाग ३: विमाननगर - लोहगाव मध्ये कशा आहेत लढती?*

अ (मागास प्रवर्ग महिला)

श्रेयस खांदवे (भाजप)

उषा कळमकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

ब (मागास वर्ग)

अनिल सातव (भाजप)

सुनील खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस)

सागर खांदवे (काँग्रेस)

bjp candidate aishwarya pathare
कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

क (सर्वसाधारण महिला)

ऐश्वर्या पठारे (भाजप)

उज्वला खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस)

गायत्री पवार (शिवसेना शिंदे गट)

ड (सर्वसाधारण पुरुष)

रामदास दाभाडे (भाजप)

बंडू खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com