Navi Mumbai Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: सावधान! मुंबईत पुढील ३-४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाकडून हाय अलर्ट

Rohini Gudaghe

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी करण्यात आलेली आहे. तर सकाळच्या शाळांना जिथे पाणी भरते, तिथे अकरा वाजता विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत. दुपारी भरती असल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याची अडचण होऊ नये, म्हणून सुट्टी जाहीर केल्याची माहिती मिळतेय.

शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईत पुढील ३-४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. नवी मुंबईतील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलीय. सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता, मात्र आता पावसाचा जोर वाढला (Navi Mumbai Municipal Corporation) आहे. नवी मुंबईत सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी सचण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पावसाचा जोर वाढला

रात्रभर उसंत घेतल्यानंतर सकाळपासून नवी मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचं सकाळी (Navi Mumbai Rain) दिसलं. नवी मुंबईत सर्वत्र रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण झाल्याचं दिसलं. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले आहेत.

राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाकडून आज पूर्व विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात (Rain Update) आलाय. त्यामुळे प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलीय. जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे. शनिवारी नागपूरात झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी हा निर्णय (Holiday Declared For Schools) घेतलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

SCROLL FOR NEXT