Dhulivandan 2023 Saam tv
मुंबई/पुणे

Dhulivandan 2023 :'आला होळीचा सण लय भारी...'; राज्यभरात उत्साहात साजरं होतंय धुलिवंदन, काय आहे यंदा विशेष कारण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dhulivandan Festival 2023 : राज्यभरात मोठ्या उत्साहात धुळवडीला सुरुवात झाली आहे. सकाळपासून तरुणाई रंगात न्हाऊन निघाली आहे. आला होळीचा सण लय भारी...असे गाण्याचे बोल अनेक तरुणांच्या ओठी दिसून येत आहे. मुंबई ते नागपुरात मोठ्या उत्साहात नागरिक धुळवड साजरी करताना दिसत आहे. कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदा यंदा निर्बंधमुक्त रंगोत्सव साजरा होत असल्याने तरुणाईंमध्ये आनंद दुणावला आहे.

राज्यात सर्वत्र धुळवडीच्या सकाळपासून तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. राज्यभरातील अनेक छोट्या-मोठ्या शहरात एकत्रित रंगोत्सव साजरा केला जात आहे. राज्यात अनेक शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तरुणांबरोबर अबाल वृद्ध देखील धुळवडीचा आनंद घेत आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येही रोज पहाटे ६ वाजता धावण्यासाठी येणाऱ्या तरुणाईने आज रंगाची उधळण केली. तर अनेक जण व्यायाम झाल्यानंतर रंगांची उधळण करत आहेत. त्याचबरोबर घरी जाऊन पुरणपोळीवर ताव मारण्याचा बेत या तरुणाईचा आहे.

मुंबईच्या काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात पहाटेपासूनच नागरिक धुळवडीसाठी एकत्र जमले आहेत. एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मॉर्निंग वॉक झाल्यावर जेष्ठ नागरिक आणि महिलांनी सुद्धा रंगांची उधळण करत गाण्याचा तालावर ठेका धरताना दिसत आहे.

नागपुरातही जोरदार जल्लोष

नागपुरातही (Nagpur) सकाळपासून तरुणाई धुळवडीचा आनंद लुटत आहे. नागपुरात सर्वत्र धुळवळीचा आनंद आहे. शहरातील अनेक सोसायटीमध्ये एकत्रित रंगोत्सव साजरा केला जात आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सिंहगड एक्सप्रेसमध्ये चाकरमान्यांनी केली रंगांची उधळण

राज्यभरातील सर्वच नागरिक सर्वत्र धुळवडीचा आनंद लुटताना दिसत आहे. मुंबई-पुणे (Pune) रेल प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली. पुणे मुंबई रेल्वे प्रवास करताना एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी असणारे पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने ही धुळवड कर्जत ते लोणावळा दरम्यान साजरी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT