Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai International Airport News: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; पोलिसांसह यंत्रणा सतर्क

Mumbai International Airport: मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या एका खोट्या कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

Mumbai International Airport:

मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या एका खोट्या कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. त्यांना तपासात अद्याप काहीच संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी आता कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर एका निळ्या रंगाच्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी कॉल आला. त्यानंतर मुंबई विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.

बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलीस आणि बॉम्बपथक विमानतळावर दाखल झालं. मात्र, त्यांना तपासात काहीच संशयास्पद आढळलं नाही. संध्याकाळी ६ वाजता विमानतळाच्या अधिकाऱ्यांना एक निनावी कॉल आला होता.

कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, 'विमानतळावर एक निळी बॅग ठेवली आहे. त्यात बॉम्ब आहे'. बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्यानंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापक सतर्क झालं. त्यानंतर यांनी विमानतळावर निळ्या बॅगचा शोध घेतला. मात्र, त्यांना विमानतळावर काहीच संशयास्पद आढळलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून सांगणायत आली आहे.

दरम्यान, या निनावी कॉलनंतर पोलीस आता बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

गणेशोत्सात अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ, गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस गस्तीवर आहेत. तसेच या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखील करडी नजर ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT