Mulashi Accident Saam tv
मुंबई/पुणे

Hit And Run: मुळशीत 'हिट अँड रन'चा थरार, भरधाव कारने ३ शाळकरी मुलांना उडवले; चालक फरार

Mulshi Paud Accident News: ही धडक इतकी भयंकर होती की तिघेही उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. जखमी आणि रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांना उडवून कारचालकाने कारसह तिथून पळ काढला.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| मुळशी, ता. ८ सप्टेंबर

Mulshi Hit And Run: गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांचे सत्र सुरू असून हिट अँड रनच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शनिवारी मुलुंडमध्ये दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव बीएमडब्लू कारने धडक दिल्याची घटना घडली होती. अशातच काल मुळशी तालुक्यातील पौड येथे भरधाव कारने तीन शाळकरी मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तीनही मुले गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर चालक फरार झाला आहे.

बेदरकारपणे चारचाकी गाडी चालवत रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या तीन शाळकरी मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना मुळशी तालुक्यातील पौड, शेरे येथे घडी. या अपघातामध्ये तिनही मुले जखमी झाली असून एकाची प्रकृती गंभीर आहे. कार्तिक रामेश्वर मावकर (वय 14, इयत्ता 8 वी आणि सम्यक प्रमोद चव्हाण (वय 14, इयत्ता 8 वी) प्रेम साहेबराव चव्हाण (वय 13, इयत्ता 7 वी), (सर्व रा.अकोले ता.मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अपघातानंतर चालक फरार झाला असून सध्या त्याचा शोध सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कार्तिक, सम्यक आणि प्रेम ही तिनही मुले शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयात शिकतात. शुक्रवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तिघेही रस्त्याच्या कडेने घराकडे चालले होते. त्याचवेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार येत होती. स्वामी समर्थ हॉटेलजवळ दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात वेगात असलेल्या कार चालकाने तिघांनाही उडविले. ही धडक इतकी भयंकर होती की तिघेही उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. जखमी आणि रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांना उडवून कारचालकाने कारसह तिथून पळ काढला.

याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही खाजगी रिक्षाने पौड ग्रामीण रूग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर मुलांना पुढील उपचारासाठी त्यांना लवळे येथील सिम्बॉयोसिस रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर प्रेम याच्या डोक्यावर केईएम रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच शेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद पिंगळे आणि शिक्षकांनी सिम्बॉयोसिस रूग्णालयात धाव घेतली. पोलीस सध्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे धडक देणाऱ्या कारचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT