Pimpri Chinchwad Hit And Run Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 'हिट अँड रन'चा थरार; भरधाव कारने वृद्ध महिलेला चिरडलं, अपघाताचा VIDEO

Hit And Run in Mumbai and Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय. एका भरधाव चारचाकी वाहनाने वृद्ध महिलेला उडवलं.

Rohini Gudaghe

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही पिंपरी चिंचवड

पिंपरी गावात काल २१ जुलै रोजी दुपारी पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना (Car Hit Two Auto Rickshaws) घडली. पिंपरी गावातील नानेकर चाळजवळ काल दुपारी दीड वाजोदरम्यान हा अपघात झालाय. एका चारचाकी वाहन चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन पळ काढल्याचं समोर आलं (Accident News) होतं. अपघातानंतर पिंपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते. चारचाकी वाहनाने वृद्ध महिलेला उडवल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

'हिट अँड रन'चा थरार

या अपघातामध्ये महिलेला जोरदार मुका मार (Hit And Run Case) लागलाय. तिला उपचारानंतर डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी मुभा दिलीय. मात्र, महिलेला धडक देणारा चारचाकी वाहन चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला होता. महिलेला धडक देणाऱ्या चारचाकी वाहन चालकाविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या वाहन चालकाचा शोध पिंपरी पोलीस घेत आहे.

मुलुंडमधील अपघात

राज्यामध्ये 'हिट अँड रन'चं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. नागपूर, पुण्यानंतर आता मुलुंडमध्ये (Mulund) हिट अँड रनची घटना घडली आहे. ऑडी गाडीने दोन ऑटो रिक्षांना उडवल्याचं समोर आलंय. या अपघातामध्ये दोन ऑटो चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय, तर एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर आहे.

भरधाव कारने दोन ऑटोरिक्षांना उडवलं

या अपघातामध्ये ऑटो रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातानंतर वाहन चालक फरार झालंय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुलुंड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मुलुंड पोलीस स्टेशनने गाडी ताब्यात घेतली आहे. मुलुंड पोलीस पुढील तपास करीत आहे. या अपघातामध्ये चारजण जखमी झाल्याचं समोर (Hit And Run Case In Mulund) आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT