Dancer Hindavi Patil in tears after PMC removes her tea stall during anti-encroachment drive in Pune’s Viman Nagar Saam tv
मुंबई/पुणे

Hindavi Patil : ढसाढसा रडली, व्हिडिओतून सगळं दु:ख सांगितलं; डान्सर हिंदवी पाटील नेमकं काय झालं?

Hindavi Patil News : पुण्यात असलेल्या हिंदवी पाटीलच्या दुकानावर पालिकेचा हातोडा पडला. या कारवाईनंतर हिंदवीने संताप व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

hindavi patil news : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात कारवाईचा सपाटा लावला आहे. पालिकेने पुण्यातील विमाननगर परिसरात दुकानादारांच्या अतिक्रमणावर करवाई केली. याच भागात प्रसिद्ध डान्सर हिंदवी पाटीलचा चहाचा स्टॉल आहे. हिंदवीच्या चहाच्या स्टॉलवरही पालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर हिंदवी पाटील ढसाढसा रडत दु:खही व्यक्त केलं. तसेच पालिकेच्या कारवाईनंतर हिंदवी पाटीलने प्रशासनाला अनेक सवाल केले आहेत.

पुण्यातल्या विमाननगर परिसरात हिंदवी पाटीलचा चहाचा स्टॉल आहे. तिच्या या दुकानाची पाटी महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तोडली. पालिकेच्या कारवाईनंतर हिंदवीला अश्रू अनावर झाले. पालिकेच्या कारवाईमुळेहिंदवी पाटील ढसाढसा रडली. पालिकेच्या कारवाईनंतर प्रसिद्ध डान्सर हिंदवी पाटीलचा ढसाढसा रडल्याचा एक व्हिडिओ वायरल होत आहे.

पालिकेच्या कारवाईनंतर हिंदवी पाटीलने आज पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर हिंदवीने कारवाईवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. माझ्याच दुकानावर हातोडा का? असा प्रश्न हिंदवीने उपस्थितीत केला आहे. माझ्या दुकानावर कारवाई का केली? कोणी करायला सांगितली, असे सवाल हिंदवीने केले. दुकानावर हातोडा मारण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदवी पाटीलने केली आहे.

काय आहे प्रकरण?

विमाननगर परिसरात हिंदवी पाटीलचं सह्याद्री अमृततुल्य नावाचं दुकान आहे. हिंदवीच्या दुकानावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई केली. 'रांगेतील इतर कुठल्याही दुकानावर कारवाई नाही, माझ्याच का?' चुकून कारवाई झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा हिंदवीने दावा केला आहे. या कारवाईची चौकशी झाली पाहिजे. अनधिकृत दुकानांवर कारवाई झाली पाहिजे. माझ्या दुकानावर कारवाई कोणी करायला सांगितली हे पण मला माहिती झालं पाहिजे, अशी मागणी हिंदवी पाटीलने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT