Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Ticket Scam Alert : उच्च शिक्षित दांपत्याला हुशारी पडली महागात! ‘AI’ चा गैरवापर करून बनावट एसी लोकल पास बनवला अन्...

Kalyan News : AI च्या गैरवापरातून बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या उच्चशिक्षित जोडप्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग किती गंभीर परिणाम घडवू शकतो याचे हे उदाहरण आहे.

Alisha Khedekar

  • एआयच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास

  • कल्याण स्थानकात तपासादरम्यान फसवणूक उघड

  • उच्चशिक्षित दाम्पत्यावर गुन्हा दाखल व अटक

  • तंत्रज्ञानाचा गैरवापर किती धोकेदायक ठरू शकतो याचे उदाहरण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनविण्याचा प्रयत्न एका उच्चशिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडला आहे. एआयच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या अंबरनाथमधील पती-पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

घटना कल्याण स्थानकातील एसी लोकलमधील तपासणीदरम्यान समोर आली. एका महिला प्रवाशाला तिकीट तपासणीदरम्यान विशाल नवले नामक टीसीने पास दाखविण्यास सांगितले. तिने रेल्वेच्या यूटीएस अॅपमधील स्क्रीन दाखवली; मात्र तो पास संशयास्पद वाटल्याने टीसीने तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून त्या पासची पडताळणी केली. तपासात धक्कादायक बाब समोर आली पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून, तो जानेवारी महिन्यात जारी केलेला आणि फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झालेला होता.

महिलेने स्वतःचे नाव गुडिया शर्मा असल्याचे सांगितल्याने टीसीचा संशय अधिक गडद झाला. डोंबिवली स्थानकात तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली. तेव्हा खरा खुलासा झाला तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर एआयच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचे नाव व तपशील टाकत बनावट पास तयार केल्याचे मान्य केले.

या गंभीर फसवणुकीनंतर आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पती एका मल्टिनॅशनल फायनान्स कंपनीत उच्च पदावर तर पत्नी नामांकित बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली.

अंबरनाथमध्ये राहणाऱ्या या प्रतिष्ठित कुटुंबातील दाम्पत्याने काहीशा पैशांची बचत करण्यासाठी केलेल्या लबाडीचे गांभीर्य आता त्यांच्यावर ओढवले आहे. एआयचा दुरुपयोग किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? सिबिलसह बॅक तपासणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

Gas Leak Safety: घरात गॅसचा वास येत असेल तर, 'या' ५ चुका करू नका, मोठा स्फोट होईल

SCROLL FOR NEXT