भेटायला ये अन्यथा पैसे दे; दोन्हीला नकार दिल्याने केला महिलेचा खासगी Video व्हायरल SaamTV
मुंबई/पुणे

भेटायला ये अन्यथा पैसे दे; दोन्हीला नकार दिल्याने केला महिलेचा खासगी Video व्हायरल

दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे एकमेकांना अनेकदा भेटले आणि एकत्र राहिले. यावेळी आरोपीने महिलेच्या न कळत तिचा अश्लील Video मोबाइलमध्ये रेकाँर्ड केले.

सुरज सावंत

मुंबई : गोरेगावच्या आरे पोलिसांनी एका व्यावसायिक महिलेला तिचा खासगी व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पहा -

का केली पैशांची मागणी -

सदर प्रकरणातील महिला आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात राहात असून पतीसोबत वारंवार खटके उडत असल्याने ती त्यावेळी वेगळी रहात होती. 2016 मध्ये ती पाटणा, बिहार येथे सेमिनारला गेली असता तिची भेट आरोपी कृष्णकांत अखोरी (25) याच्याशी झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे एकमेकांना अनेकदा भेटले आणि एकत्र राहिले. यावेळी आरोपीने महिलेच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकाँर्ड (Video Record) केले. दरम्यान कालांतराने पीडित महिला आणि तिच्या पतीमधील संबध पून्हा चांगले झाल्याने पीडित महिलाही नवऱ्यासोबत एकत्र रहात होती. त्यानंतर आरोपी कृष्णकांत याने महिलेला भेटण्यासाठी आणि संबंध ठेवण्यासाठी अनेकवेळा दिल्लीला (Delhi) बोलावले, मात्र महिलेने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडित महिलेचा अश्लील व्हिडिओ तिच्या मोबाइलवरती पाठवून हा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) टाकण्याची धमकी देऊन महिलेकडून पैसे उकळले.

मात्र दिवसे़दिवस आरोपीकडून पैशांची मागणी वाढू लागल्याने कालांतराने पीडित महिलेने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने संबधित व्हिडिओ महिलेच्या पतीला पाठवला. दरम्यान महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे आरे पोलिसांनी (Aare Police) कलम 385,354 (अ) आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरे पोलीसांनी तांत्रिकदृष्या तपास करून आरोपीला दिल्लीतील कमला विहार येथून अटक केली. आरोपी सध्या पोलिसांच्या कोठडीत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT