Helmet compulsory for pillion riders in mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेटसक्ती

Helmet Compulsory For Pillion Riders In Mumbai : येत्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकातून जाहीर केलं आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईत (Mumbai) आता दुचाकीवरून (Bike) प्रवास करताना मागे बसणाऱ्या पिलियन रायडरलाही (pillion rider) हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात येणार आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्हीही व्यक्तींनी हेल्मेट (Helmet compulsory) वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकातून जाहीर केलं आहे. हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नव्या नियमात करण्यात आली आहे. (Helmet compulsory for pillion riders in mumbai)

हे देखील पाहा -

दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेटसक्ती

रोड अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोटर वाहन (Traffic Rules) अॅक्ट १९९८ मध्ये मोठे बदल केले आहेत. या कायद्यात हेल्मेटचा (Helmet) नियम लागू करण्यात आला आहे. भारतात दोन चाकी वाहनांच्या अपघाताची संख्या वाढली आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. देशात अपघाताच्या बाबतीत नागरिक अजुनही गंभीर झालेले नाहीत. हेल्मेट सोबत ठेवतात पण त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे आता यावर नवे नियम लागू केले आहेत.

किती भरावा लागणार दंड

नव्या नियमानुसार जर वाहन चालकाने हेल्मेट (Helmet) घातले असेल पण त्या हेल्मेटची पट्टी खुल्ली असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा गालू शकतो. जर तुम्ही आयएसआय मानांकनाचे हल्मेट घातले नसेल तर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावे लागणार. अनेकवेळा काहीजण पोलिसांना चकवा देण्यासाठी खराब झालेले हेल्मेटचा वापर करतात. पण आता यांच्यासाठीही सरकारने नियम कडक केले आहेत. अशा पध्दतीचे हेल्मेट असेल तर आता वाहतुक पोलीस तुमच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसुल करु शकतात.

आता अशा पध्दतीने वाहनचालक सापडले तर त्या वाहन चालका विरोधात कलम १२९ नुसार सरकार कारवाई करु शकते. वाहन चालकाने हेल्मेट घातले असेल पण ते योग्य पध्दतीने घातले नाहीतर त्याच्याकडून २ हजारांचा दंड वसुल केला जावू शकतो. जास्त वजनाच्या गाड्यांविरोधातही सरकारने नवे नियम लागू केले आहेत. नियमापेक्षा जास्त वजन गाड्यांमध्ये असेलतर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर तुम्ही रोज वाहनांचा वापर करत असाल तर हे बदलले नियम एकदा पाहून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

लहान मुलांसाठी नवे नियम

तुम्ही वाहन चालवताना जर तुमच्या सोबत लहान मुलगा असेलतर त्या मुलाच्या डोक्यावरही हेल्मेट (Helmet) असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासोबत हार्नेट बेल्टचा वापर करणे अनिवार्य आहे. हा बेल्ट चालकासोबत बांधुन ठेवावा लागणार आहे. कारण वाहन चालवताना लहान मुलगा यामुळे खाली पडू शकणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT