Pune Helicopter Crash  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

Girish Nikam

मुंबई : लोकसभेनंतर आता विधानसभेची धामधूम सुरु झाली आहे. अशा वेळी राज्यभरात भिंगरी सारखा प्रचार करायचा असेल तर हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नाही. मात्र हेलिकॉप्टरचा प्रवासही धोकादायक बनलाय. पुण्याजवळ बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय..

याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. इथल्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. मात्र या डोंगराळ भागात धुकं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जातयं. खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होंतं. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला. सुनील तटकरे यांनी मंगळवारी याच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या हेलिकॉप्टरने पुणे-परळी-पुणे असा प्रवास केला होता. तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने मुंबईतून रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते

कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अपघात झाल्यामुळे नेत्यांचं टेंशन वाढलंय.

हेलिकॉप्टर अपघाताची कारणं पाहूया...

हेलिकॉप्टर अपघाताची 5 कारणं

देशात 40% हेलिकॉप्टर अपघात पायलटच्या चुकांमुळे

19% हेलिकॉप्टर अपघात प्रतिकूल हवामानामुळे

9% अपघात दुर्गम भागातील डोंगराळ प्रदेशातील युटिलिटी केबल्समुळे

युटिलिटी केबल्स असणाऱ्या भागात सावधानतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणांचा अभाव

उड्डाण परवाना आणि प्रशिक्षण निकष पाळले जात नसल्याचं उघड

पुणे जिल्ह्यातील पौड भागात २४ ऑगस्ट रोजी एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता निवडणुकीच प्रचारासाठी नेते मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरचा वापर करणार. आता या दुर्घटनेमुळे नेत्यांचं टेंशन वाढलंय एवढं मात्र नक्की. त्यामुळे सुरक्षेबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Israel Iran War : इराण की इस्रायल कोण पडणार युद्धात भारी? कोणाची किती ताकद? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT