Sion Flyover Saam Tv
मुंबई/पुणे

Sion Flyover: सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन

Mumbai News: शीव (सायन ) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केला.

साम टिव्ही ब्युरो

शीव (सायन ) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे शीव (सायन) उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि २.८० मीटरपेक्षा उंचीच्या वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

तसेच १७ जुलै २०२४ रोजी मोहरम सणानिमित्त वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागातून मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात नागरिकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी या भागातील मार्गांवरुन प्रवास करणे टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

मोहरम सणाच्या निमित्ताने दरवर्षी माहीम रेती बंदर येथे ताजिया विसर्जित करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यंदाही अशाप्रकारच्या मिरवणुकीचे आयोजन होत असल्याने काही मार्गावर गर्दी होऊ शकते.

त्यामुळे, नागरिकांनी बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून गुरूवार, दिनांक १८ जुलै २०२४ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत या कालावधीत 'जी उत्तर' विभागातील 'टी जंक्शन' ते कला नगर, ६० फूट रस्ता, ९० फूट रस्ता, एस. एल. रहेजा मार्ग, माहीम कॉज वे या मार्गावरुन वाहन नेणे किंवा प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT