Thane Traffic Update Saam tv
मुंबई/पुणे

Thane Traffic Update: मोठी बातमी! ठाण्यात दिवसा अवजड वाहनांना बंदी; मालवाहतुकीला असे आहेत पर्यायी मार्ग?

Vishal Gangurde

Thane News: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते पडघ्यापर्यंतचा रस्त्यावर अनेक खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे ठाण्यातील वाहतूक मंदावली आहे. यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे शहर परिसरात दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या अवजड वाहनांना पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी असणार आहे. (Latest Marathi News)

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनधारकांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जुना नाशिक-मुंबई हायवेवरून एकाच वेळी जड-अवजड व छोटी वाहने जात असल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरून आदेश द्यावे लागले होते.

दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणे शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पहाटे ५ ते रात्री अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा असणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी निर्णय घेतला आहे.

ठाणे पोलिसांचा हा निर्णय 30 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. मुंबई, नवी मुंबई मार्गे ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना आनंद नगर टोलनाक्यावर बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबईतून मुंब्रा मार्गे येणाऱ्या वाहनांना शीळफाटा येथे बंदी घालण्यात आली आहे. तर नाशिककडून येणारी अवजड वाहतूक शहापूर येथे अवजड वाहने अडवली जाणार आहे. गुजरातकडून येणारी वाहने मनोर येथे अवजड वाहने अडवली जाणार आहे.

पर्यायी मार्ग कसे आहेत?

१) जेएनपीटी, मुंब्रा बायपासमार्गे व भिवंडी, नाशिक, गुजरातकडून येणारी अवजड वाहने शहापूर येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरून डावे वळण घेऊन सापगाव-डी पॉईंट-जेएनपीटी, नवी मुंबईच्या दिशेने जातील. अवजड वाहने मुरबाड-कर्जत चौक फाटा असा प्रवास करतील.

२) राष्ट्रीय महामार्ग क्र. ८- अहमदाबाद, गुजरातकडून नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना मनोर (टेन नाका) येथून डावे वळण घेऊन पोशेरी पाली-वाडा नाका घेऊन अविटघर-कावरे येथून उजवे वळण घेऊन पिवळी-कैल्हे दिशेने मार्गस्थ होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT