Ganpati Festival 2024 Mumbai Goa Highway Heavy Traffic:  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai- Goa Highway Traffic: 'चाकरमानी निघाले गणरायाच्या स्वागताला..' मुंबई- गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाचा अपडेट्स...

Ganpati Festival 2024 Mumbai Goa Highway Heavy Traffic: बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर आल्याने मुंबईतील चाकरमानी आज गावाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. चाकरमान्यांच्या गर्दीने बसस्थानके, रेल्वेस्टेशनसह मुंबई- गोवा महामार्गही भरुन गेला आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, रायगड|ता. ५ सप्टेंबर

Mumbai Goa Highway Traffic: गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी चालू असून मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचीही गावी जाण्याची गडबड सुरू आहे. नोकरी, तसेच व्यवसायानिमित्त मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमानी गावाकडे निघाल्याने बसस्थानके, रेल्वेस्टेशन गर्दीने फुलून गेले असून आज सकाळपासून मुंबई- कोकण महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाश्यांचेही हाल होत असून ट्रॅफिक सुरळित करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

चाकरमानी निघाले गावाला...

गणपती उत्सव आला की मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आता बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर आल्याने मुंबईतील चाकरमानी आज गावाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. चाकरमान्यांच्या गर्दीने बसस्थानके, रेल्वेस्टेशनसह मुंबई- गोवा महामार्गही भरुन गेला आहे तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी

आज सकाळपासून कोकण रेल्वेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई, सुरत, अहमदाबाद, वांद्रे , पनवेल वरुन 310 विशेष गाड्या सुटणार आहेत. गावी जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास 150 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी!

चाकरमान्यांनी गर्दी केल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील माणगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. माणगाव, तळेगाव, लोणेरे दरम्यान गणेशभक्त वाहतूक कोंडीत अडकले असून रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने मोठा खोळंबा झाला आहे. माणगाव बाजार पेठ, तळेगाव येथील उड्डाण पुल आणि लोणेरे विद्यापिठ जोडरस्ता परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तसेच मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथेही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही लेन वरती वाहने आल्याने रस्ते ठप्प झाले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपनेही विशेष बसेस गाड्यांची सोय केली आहे. बीकेसी मैदानावरुन आज दुपारी १ वाजता मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते झेंडा दाखवून या गाड्या रवाना करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला ही शुभ वस्तू नक्की खरेदी करा, दारिद्र्य होईल दूर

Blouse Matching Sarees: दिवाळीच्या शॉपिंगमध्ये महिलांनी 'हे' ब्लाउज विकत घेतलेच पाहिजेत

Election Commission Inquiry: महाविकास आघाडीच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश|VIDEO

Aadhaar Card: आधार कार्डमध्ये ही माहिती फक्त एकदाच बदलता येते; अपडेट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

SCROLL FOR NEXT