Pune Rain Latest Updates, Heavy Rain In Pune News, Pune Monsoon Live Updates
Pune Rain Latest Updates, Heavy Rain In Pune News, Pune Monsoon Live Updates Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - गेल्या २ -३ दिवसांपासून पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना (Pune) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Pune Rain Latest Updates)

भिडे पुल पाण्याखाली

गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी या पुलावरुन वाहतुक बंद ठेवण्याल आली आहे. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांनी खंडोजीबाबा पुलाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.

हे देखील पाहा -

पुण्यात झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. (Pune Monsoon Live Updates)

दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजता डेक्कन नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे डेक्कन वाहतूक विभागाकडून मंगळवारी रात्रीपासूनच भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला. पोलिसांनी डेक्कन बसस्थानक पासून भिडे पुलाकडे जाणारा रस्ता तसेच नारायण पेठेकडून डेक्कनकडे जाणारी वाहतुक बंद केला आहे. पोलिसांकडून त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT