Pune's Bhide Bridge submerged after continuous rainfall; Mutha river discharge from Khadakwasla Dam increased significantly. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Heavy rains continue in Pune : मागील दोन दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. खडकवासला (77.07%), पानशेत (92.68%), वरसगाव (93.26%), आणि टेमघर (88.48%) हे चारही धरणे जवळपास ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत.

Akshay Badve

  • पुण्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्यामुळे नद्या-नाले ओसांडले.

  • पुण्याला पाणी पुरवणारी चारही धरणे ९०% भरली.

  • मुठा नदीच्या वाढलेल्या पातळीमुळे भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला.

  • वाहतुकीवर परिणाम होत असून, प्रशासनाने नदीकाठच्या रस्ते बंद केले आहेत.

Pune Bhide Bridge flooded due to heavy rain : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाले ओसांडून वाहत आहेत. पुण्याला पाणी-पुरवठा करणारी धरणेही ९० टक्के भरले आहेत. मागील दोन तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. परिणामी खडकवासला धरणातून मिठा नदीत पाण्याचा विसर्ग देखील आता वाढवला आहे. रविवारी दुपारी खडकवासला धरणातून 14 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होता, तो आज सकाळी २२ हजारांवर गेला आहे. वादळी पावसामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच मुठा नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बाबा भिडे पुलाजवळ सुरू असलेल्या मेट्रो पुलाच्या कामामुळे पूल वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र पुण्यात समाधानकारक पाऊस झाला हे कसं ओळखायचं तर भिडे पूल पाण्याखाली गेला तरच होय, असं पुणेकर गंमतीने म्हणतात.

पुण्यात आजही पावसाची शक्यता -

मागील काही दिवसांपासून पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहेत. आज सकाळपासून पुणे शहरासह उपनगरात हलक्या पावसाने हजेरी लावली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामासाठी निघालेल्या पुणेकरांचे धावपळ झाली. पुणे शहरासह उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. आज पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यातील धरणं ९० टक्के भरली -

पुण्यातील जवळपास सर्व धरणं ९० टक्के भरली आहेत. काही दिवसांपासून पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामध्ये धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणे मिळून ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपेक्षा ९ टक्के जास्त पाणीसाठा आहे. खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारे चार धरणे मिळून २६.६३ टी एम सी पाणी झाले आहे.

कुठल्या धरणात किती टक्के पाणीसाठा

खडकवासला: 77.07 टक्के

पानशेत: 92.68 टक्के

वरसगाव: 93.26 टक्के

टेमघर: 88.48 टक्के

पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार -

खडकवासाला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार आहे. सकाळी आठ वाजता २२ हजार १२१ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने विसर्ग वाढवला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात जास्त विसर्ग होणार आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली तर नदी पात्रातील रस्ता बंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

SCROLL FOR NEXT