Lonavala Rainfall Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai- Pune Expressway: लोणावळ्यात तुफान पाऊस, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचे हाल

Lonavala Rainfall: लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे याठिकाणावरून दोन्ही मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळ्यामध्ये पावसाची जोरदार (Lonavala Rainfall) बॅटिंग सुरू आहे. लोणावळा आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या तासाभरापासून या याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे याठिकाणावरून दोन्ही मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. वाहन चालकांना अतिशय सावकाश वाहनं चालवावी लागत आहेत.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र लोणावळ्यात आलेले पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत.

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. लोणावळ्यातील तापमान हे जवळजवळ ४१ अंशापर्यंत गेले होते. मात्र आता आलेल्या या पावसामुळे लोणावळ्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे लोणावळाकरांसोबत पर्यटक देखील सुखावले आहेत. या पावासामुळे आतापासून पर्यटकांची पाऊले लोणावळ्याच्या दिशेने जाण्यास सुरूवात झाली आहे.

इंद्राणी भाताचा आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळात मोठ्या प्रमाणात भात शेती केले जाते आणि या पावसाचा भाताला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या पावसामुळे बळीराजा आनंदित झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : म्हशीनं पाजलं बिबट्यांना दूध? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Todays Horoscope: या राशींसाठी महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहे, वाचा आजचं राशीभविष्य

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

SCROLL FOR NEXT