Pune Rain Updates Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Updates: पुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Pune Rain Alert: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Rain News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर दाट ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. (Latest Marathi News)

हवामान खात्याने पुण्यात सकाळी आकाश निरभ्र आणि दुपारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज (Rain Alert) तंतोतंत खरा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यांना सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

पुण्यात (Pune News) दुपारनंतर आकाशात क्युम्यूलोनिंम्बस म्हणजेच उंचीने मोठे ढग तयार झाले होते. त्यामुळे आज दुपारच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या प्रकारच्या ढगांमुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील दाट शक्यता असते. (Breaking Marathi News)

राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने येत्या २४ तासांत राज्यातील काही भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. खरंतर, महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या २४ तासामध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT