Heavy Rain In Mumbai: चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Heavy Rain: मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस; जलमय रस्त्यामुळे काही ठिकाणी वाहतुक कोंडी

Heavy Rain In Mumbai: आज, शुक्रवारी, सकाळपासून पावसाचा जोर ठाणे शहरात वाढला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस (Heavy Rain) पडत आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपलं आहे. खासकरुन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे यांच्यासह मुंबई उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार बॅटींग केल्याने अनेक ठिकाणचे रस्ते हे जलमय झाले होते. यामुळे वाहुतकीची गती धीमी झाली तर, काही ठिकाणी वाहतुक कोंडीही झाली. (Mumbai Weather News)

वसई-विरारमधील रस्ते पुन्हा जलमय

वसई-विरारमध्ये पहाटे पासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर, जया पॅलेस,तुळींज रोड वरील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले आहे. गाला नगर रोडवरील उभे असलेले वाहनेही साचल्याने पाण्याखाली गेलेली आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर हा पाऊस असाच सुरु राहिला, वसई-विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाण्यात वाहतूक कोंडी

आज, शुक्रवारी, सकाळपासून पावसाचा जोर ठाणे शहरात वाढला आहे. त्यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहनांच्या रांगा (Traffic Jam) लागल्या आहेत. घोडबंदर रोडवरील ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या कापूरबावडी नाका ते कासारवडवली या रस्त्यावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर सर्विस रोड रिकामे ठेवण्यात आले आहेत.

हवामान विभागाचा अंदाज

काल गुरुवारी मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागात, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली. पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT