Weather Mumbai Rain, Pune Rain, Nashik Rain - Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार; मुंबई, नाशिक, पुण्यासाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट

मुंबईपाठोपाठ पुण्यातही मुसळधार पाऊस झाला.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : जून महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात चांगलंच कमबॅक केलं आहे. राज्यातील बहुतांश भागात सतत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह यामुळे पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. (Mumbai Pune Rains Update)

सोमवारपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईपाठोपाठ पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुणे शहरात मंगळवारी रात्रभरात सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला, तर चिंचवड परिसरात तब्बल ५४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सून दाखल झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. बुधवारी (ता.६) पहाटे तीन वाजता हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

येत्या 24 तासांत पुण्यात मुसळधार

दरम्यान, राज्यात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनने आता संपूर्ण देश व्यापला असून, महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर तो सक्रिय झाला आहे. कोल्हापूर, सांगली भागात अतिवृष्टी झाली असून, उर्वरित राज्यातही माध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. पुणे आणि नाशिक शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharastra Rains Update)

प्रवास टाळा, प्रशासनाचं आवाहन

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात दरड कोसळण्याची शक्यता सतर्क संस्थेच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. संततधार पावसात संभाव्य रस्त्यावरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT