Konkan Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Konkan Railway : मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, रेल्वे रुळावर माती; मांडवी एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल

Konkan Rain: पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. दिवाणखवटी जवळ बोगद्यात ट्रॅकवर माती आल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अमोल कलये

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकातच थांबवण्यात आली आहे. पावसामुळे एकीकडे रस्त्यावरील वाहतूक मंदावलेली असताना आता रेल्वेला देखील फटका बसला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, दिवाणखवटी जवळ बोगद्यात ट्रॅकवर माती आल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकातवर थांबवण्यात आली आहे. तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेसही रत्नागिरीत थांबण्यात आली आहे.

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यातच दिवाणखवटी परिसरात दरड कोसळल्यामुळे रेल्वे रुळावर माती साचली असून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आपल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रुळावरील माती हटवण्याची कोकण रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.

चिपळूणमध्ये पूरस्थिती कायम

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. येथील अनेक भागात पुराचे पाणी साचले असून स्थानिकांना आपल्या घरी जाण्यासाठीदिड ते दोन फुटापर्यंत पाण्यातून जावं लागत आहे. पावसचा जोर कायम आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुराचा धोका वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT