Rain Update: राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, पुण्याला रेड अलर्ट
Rain Update: राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, पुण्याला रेड अलर्ट Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update: राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, पुण्याला रेड अलर्ट

साम टिव्ही ब्युरो

पुणे - पुण्यात Pune पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा Rain अंदाज हवामान विभागाकडून Metrological Department वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ gulab cyclone तयार झाले आहे. ते जमिनीला धडकल्यानंतर विदर्भापर्यंत पुढे येईल.

मात्र, त्याचा प्रभाव पुढे कोकणापर्यंत जाणवणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगिले आहे. पुण्यात दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून शहरात पावसाच्या हलक्या सरी पडतील. मात्र, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असणार आहे. तसेच येत्या मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हे देखील पहा -

बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ काल म्हणजेच २६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर विदर्भात चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघरसह Palghar १७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस Rain कोसळू शकतो. सोमवारसाठी पुणे, सातारा, नाशिक, रायगड, लातूर, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तीन तासांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा Heavy Rain अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT