Mumbai Rain Alert Saam Tv
मुंबई/पुणे

IMD Rain Alert : सावधान! पुढील ३ तास महत्वाचे, मुंबईसह रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rain Alert To Navi Mumbai Raigad: मुंबईसह रायगडला पुढील तीन तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाने केलंय.

Rohini Gudaghe

सिद्धार्थ म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा शहरात संततधार सुरू झालीय. दिघा, वाशी, नेरुळ आणि बेलापूर विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. मागील २४ तासांत ५० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. भारतीय हवामान विभागाने पुढील ३ तासांत मुंबईसह रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आलंय.

पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

ठाणे शहरात दुपारच्या सुमारास देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलं जातंय. सतत पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण (Mumbai Rain Alert) झालाय. मुंबईसाठी पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय.

पावसाची संततधार सुरू

मुंबईच्या उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात (Rain Alert) झालीय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सब वेमध्ये देखील पाणी साचलंय. वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेट लावून नागरिकांना आणि वाहनांना सब वेतून जाण्यास मनाई केलीय. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पूलाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. अंधेरी सब वेवर जमा झालेल्या पाण्यामुळे परिसरातील (Mumbai Rain) अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय.

पावसाची बॅटिंग सुरूच

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात रात्रीपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणी बदलापू मधील उल्हास नदीला येत (Mumbai News) आहे. त्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, धोक्याची पातळी नदीने ओलांडलेली नाही. प्रवाहाचा आनंद घेण्यासाठी नागरिक नदीवर येत आहेत, असाच पाऊस पडत राहिल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT