heavy rain Alert in Mumbai important instructions issued by the Municipal Corporation Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : सावधान! पावसात झाडाखाली अजिबात थांबू नका; मुंबई महापालिकेने सांगितलं त्यामागचं कारण

Mumbai Rain Updates: पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे, साम टीव्ही

Mumbai Rain Updates: उशीरा का होईना, अखेर पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर बघता मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी जवळपास पूर्ण केली आहे. तसेच जी झाडे कमी धोकादायक आहेत, अशा उर्वरित झाडांचीही शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने झाडांच्या छाटणीबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्यान विभागाकडून योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही केली.

मुंबईकरांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी, वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे.

तसेच नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड अथवा फांद्या तुटण्याची दाट शक्यता असते. याशिवाय वीज कोसळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसापासून बचाव करताना मुंबईकरांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.

सोसायटीच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती अतिधोकादायक असलेल्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात तात्काळ कळवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येत आहे. दिनांक १ ते १९ जून २०२३ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात १४७ झाडे आणि २५३ फांद्या तुटल्या आहेत.

यात महानगरपालिकेच्या हद्दीतील ३९ तर खासगी मालमत्तेतील १०८ झाडांचा समावेश आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून उद्यान विभागाने महानगरात अतिधोकादायक झाडे आणि फांद्यांचे सर्वेक्षण केले असून, त्यानुसार खबरदारी घेत झाडांची छाटणी करण्यात आली आहे.

वृक्ष छाटणीसाठी बजावल्या नोटीसा

उद्यान विभागाने शासकीय आणि खासगी मालमत्तेच्या ठिकाणी असलेल्या साडे चार हजार झाडांच्या छाटणीबाबत संबंधित विभागांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या झाडांची देखील लवकरात लवकर छाटणी करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. तसेच मुंबईकरांनी आपल्या आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि भविष्यातील धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT