Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट; आठवड्यातून ३ दिवसच धावणार, ही आहेत कारणे

Mumbai Goa Vande Bharat Express Time Table Change: रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्राकात आणखी काय म्हटलंय ते जाणून घेऊ.
Mumbai Goa Vande Bharat Express
Mumbai Goa Vande Bharat ExpressSaam TV
Published On

Mumbai Goa Vande Bharat Express: सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही ट्रेन आता आठवड्यातून तीन दिवसच धावणार आहे. एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलल्याने नागरिकांची तारांबळ होणार आहे. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्राकात आणखी काय म्हटलंय ते जाणून घेऊ. (Latest Marathi News)

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन (Mumbai-Goa Vande Bharat Express Train) आतापर्यंत आठवड्यातून ६ दिवस धावत होती. शुक्रवारी ही एक्स्प्रेस ट्रेन बंद असायाची. मात्र मान्सूनमुळे ट्रेनचे नियमीत वेळापत्रक बदलले आहे. पावसाळ्यात मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून पहाटे ५.३२ वाजता सुटणार असून पुढच्या १० तासांनंतर दुपारी ३. ३० वाजता मडगावला पोहोचेल.

Mumbai Goa Vande Bharat Express
Mumbai Local Train Viral Video: महिला मंडळाचा नादच खुळा; लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना दिली भन्नाट नावे, वाचून म्हणाल...

परतीच्या प्रवासाची वेळ

परतीच्या प्रवासासाठी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर रात्री १०. २५ पर्यंत ही एक्सप्रेस सीएसएमटीला पोहोचेल. मडगावहून परतीच्या प्रवासासाठी एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.

हा निर्णय घेण्याचे कारण काय?

नुकताच पावसाळा (Rain) सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेकदा रेल्वे (Train) रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ट्रेन वेळेवर पोहचत नाही. पावसाचा अंदाज घेत दरवर्षी कोकण रेल्वेवर निर्बंध घातले जातात. यंदा देखील कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसवर देखील झालाय. त्यामुळे ही ट्रेन आता आठवड्यातून केवळ तीन दिवस धावेल.

Mumbai Goa Vande Bharat Express
Mumbai Local Train Crime: धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com