shivsena news
shivsena news  saam tv
मुंबई/पुणे

Shivsena News: शिवसेना कोणाची? वकिलांमध्येच शाब्दिक चकमक,निवडणूक आयोगासमोर झाला वाद; पाहा नेमकं काय झाल?

Gangappa Pujari

Mumbai News: शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निकाल काय निकाल देतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांंकडून याबद्दल जोरदार युक्तीवाद सुरू आहे.

संपूर्ण खटल्याचा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत, तर शिंदे गटाच्या वतीने अँड महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. मात्र आयोगासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची बातमी समोर येत आहे. (Shivsena)

याबाबत अधिक माहिती अशी की, युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? असा प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला.

कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली. ज्यानंतर वाद निवळला आणि पुन्हा सुणावनीला सुरूवात झाली आहे. (Election Comission)

दरम्यान, शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच, मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT