Covid-19 update  Saam tv
मुंबई/पुणे

Corona Virus Update : जगात कोरोनाचा कहर, भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यतज्ज्ञ काय म्हटले? वाचा

Covid-19 update : जगभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यावर आरोग्यतज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोरोना विषाणूने पुन्हा महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. यामुळे यंदा पुन्हा एकदा आता मास्क सक्ती होणार का, कोरोनाची लाट येणार असे विविध प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत. कारण राज्यात 50 हून अधिक रुग्ण कोरोना विषाणूचे आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक रुग्ण मुंबई विभागात आढळले आहेत. तर पुणे शहरात एका 87 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली.

आशिया खंडातील सिंगापूर हॉंगकॉंग यासारख्या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे तेथील काही शहरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. मात्र भारतात या कोरोनाची लाट फारशी चिंताजनक नसेल, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगभरातील लोकांची चिंता वाढली आहे.

'भारतात जेव्हा कोरोनाची लाट आली, तोपर्यंत भारतीयांनी लस घेतल्या होत्या. आता कोरोनाची गंभीर लाट येणार नाही. लॉकडाऊनचा प्रश्न सोडून द्या, पावसाळा आणि हिवाळा येतोय. त्यावेळी फक्त व्हायरल इन्फेक्शन वाढतात. त्यावेळी सावधानता बाळगावी, अशी माहिती सीएसआयआरचे माजी महानिरीक्षक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. विषाणूमध्ये भरपूर उत्परिवर्तन होत असतात. त्यामुळे या कोरोना विषाणूचे उत्परिवर्ती येताच राहणार आहे, पण त्याचे परिणाम फारसे गंभीर नसणार असं, डॉ. मांडे म्हणाले.

'तुम्ही खबरदारी म्हणून मास्क वापरू शकता, पण लॉकडाऊनची कुठलीच शक्यता आणि तसेच नवीन लस घेण्याबाबत सरकारने कुठलीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे कुठलेही चिंतेचा वातावरण नसल्याचे मत सुद्धा डॉ. मांडे यांनी व्यक्त केले आहे. सर्दी ताप आल्यावर जे खबरदारीचे उपाय घेणे म्हणजेच गरम पाणी उकळून पिणे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, या गोष्टी केल्या तर या विषाणूंची लागण होणार नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT