Manasvi Choudhary
कोरोना काळात लॉकडाउन हा शब्द खूप प्रचलित झाला.
लॉकडाउनचा मराठीत अर्थ टाळेबंदी असा आहे.
आपत्कालीन परिस्थितीत लोकांची हालचाल रोखण्यासाठी सरकार लॉकडाउन घालते.
लॉकडाउन म्हणजे कोणतीही व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही.
लॉकडाउनचा वापर एखाद्या सुविधेतील लोकांना किंवा संगणकीय प्रणालीला धोका पोहचल्यास संरक्षण करण्यासाठी केला जातो.
लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येतात.
शाळा, महाविद्यालयेही, कंपन्या, ऑफिस, दुकाने बंद ठेवली जातात. बाहेर पडणाऱ्यांना आवश्यक कारण देऊनच बाहेर पडता येतं.
कोरोनाकाळात भारतात लॉकडाउन करण्यात आला होता.
लॉक डाऊन किती काळासाठी असेल हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतं.