हक्काच्या घरासाठी ४५ वर्ष लढले वयाच्या ७५ व्या वर्षी मिळालं यश  Saam TV
मुंबई/पुणे

हक्काच्या घरासाठी ४५ वर्ष लढले वयाच्या ७५ व्या वर्षी मिळालं यश

असं म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कारण न्याय मिळायला कधी महिने तर कधी कित्येक वर्षे लागतात.

सुमित सावंत

मुंबई : मुंबईतील एका ७५ वर्षीय आजोबांनी तब्बल ४५ वर्ष न्यायालयीन लढाई लढून स्वतःचं हक्काचं घर मिळवलं आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मिळालेल्या हक्काच्या घरामुळे एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात ४५ वर्षांच्या प्रतीक्षेमुळे अर्ध जीवन हक्काच्या घरासाठी आयुष्य कुठंत काढावं लागल्याचं दुःख अशी स्थिती या आजोबांची आज कोर्टाचा निकाल लागल्या नंतर झाली होती.

असं म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कारण न्याय मिळायला कधी महिने तर कधी कित्येक वर्षे लागतात. असाच काहीसा अनुभव मुंबईतील (Mumbai) एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आला आहे. सध्या ट्रांजिस्ट कॅम्पमध्ये राहणारे ७५ वर्षीय सूर्यकांत विठ्ठल राऊत . सध्या वृद्धपकाळामुळे त्यांना व्यवस्थित चालता, बघता येत नाही . पण सध्या त्यांच्या चेऱ्यावरचा आनंद समाधानाची पोचपावती देत आहे. कारण गेल्या ४५ वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शासन आणि कोर्ट दरबारी झिजवलेल्या जोड्यांचं चीज झालं आहे. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे त्यांना आपल्या हक्काचं घर आता मिळालं आहे.

सन १९७६ मध्ये मुंबईत विकासाचे वारे तेजीत वाहू लागले. भायखला पश्चिमेला देखील पुनर्विकासाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा विठ्ठल राऊत यांना घर सोडून कन्नमवार नगरमध्ये राहायला जावं लागलं. कन्नमवार नगरमधील ट्रांजिस्ट कॅम्पमधील घरात रहात असताना २ वर्षांनी आपलं पुनर्वसन झालेलं घर केव्हा मिळेल यासाठी त्यांनी म्हाडा कार्यालयात खेटा मारल्या. पण ठोस उत्तर काही मिळालं नाही. त्यामुळे १९९१ मध्ये विठ्ठल यांनी आपला मुलगा सूर्यकांत हा कायदेशील आपला वारस असल्याचं हमीपत्र सादर केलं. आणि १९९३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यावेळी सूर्यकांत यांनी अनेक वर्षे म्हाडा कार्यालयात खेटा मारल्या पण घर मिळत नसल्यामुळे त्यांनी, कोर्टात याचिका दाखल केली, आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर त्यांना आता न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हाडाला सूर्यकांत यांना घर देण्याचे आदेश दिले आहेत .

सूर्यकांत राऊतांचा संघर्ष अद्याप पूर्ण संपलेला नाही. त्यांना अजूनही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात त्यानां जे घर म्हाडाकडून देण्यात आलं आहे ते २३ व्या मजल्यावर आहे, ७५ वर्ष वय असल्याने त्यानां त्यात ए जा करणं अवघड आहे. एवढचं नव्हे तर १८ दिसेम्बर २०२१ रोजी त्यानां घराचा ताबा मिळाला असताना या घराचा मागील ५ वर्षाचा मेन्टेनेन्स चार्ज म्हणून ४३७६०/- रुपये त्यानां भरन्यास म्हाडा तर्फे सांगण्यात आलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

फिल्मी स्टाईल Honeymoon Destination शोधताय? रणबीरच्या सुपरहिट चित्रपटाचं 'हे' लोकेशन बेस्ट

SCROLL FOR NEXT