Harshvardhan Patil Join NCP Sharad Pawar Group Saam Tv
मुंबई/पुणे

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेंशन वाढलं; आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क? VIDEO

Indapur politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन एका दगडात दोन पक्षी मारलेत. त्यामुळे भाजपच नाही तर अजित पवारांच्या पक्षाचंही टेंशन वाढलंय...विशेष म्हणजे उमेदवारीसह हर्षवर्धन पाटलांचं मंत्रिपदही पक्क झाल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. त्यामुळे आता इंदापूरचं गणित नेमकं कसं असणार आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : इंदापूरात हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली आणि शरद पवारांनी उमेदवारीचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाच्या दत्ता भरणेंचं टेंशन वाढलंय... तर हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकल्याने इंदापूरचे राजकीय समीकरण बदलणार आहेत. त्यामुळे दादांच्या पक्षाची आणखी एक जागा रेड झोनमध्ये गेल्याची चर्चा रंगलीय...आतापर्यंत दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये सलग तीन वेळा थेट सामना झालाय.

2009

काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांकडून अपक्ष दत्ता भरणेंचा 8 हजार मतांनी पराभव

2014

राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांचा 6 हजार मतांनी पराभव

2019

राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना 3 हजार मतांनी पराभव

सलग 2 निवडणूकीत हर्षवर्धन पाटलांना चीतपट करणारे राष्ट्रवादीचे दत्ता भरणे सध्या अजित पवारांच्या पक्षात आहेत. त्यामुळे दत्ता भरणेंचा पराभव करण्यासाठी पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावलंय.. तर हर्षवर्धन पाटलांनी पवारांचा बिग बॉसचा हात पाठीवर असल्याने आपलाच विजय होणार असल्याचा दावा केलाय. तर पवारांनी हर्षवर्धन पाटलांना मंत्रिपद देण्याचे संकेत दिलेत...

पवारांनी हर्षवर्धन पाटलांना मंत्रिपदाचे संकेत दिले असले तरी हर्षवर्धन पाटीलांनी युती असो वा आघाडी दोन्ही सरकारांमध्ये सलग 4 वेळा मंत्रिपद भुषवलंय.

कशी आहे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकिर्द

1995-99 युती सरकारमध्ये कृषी राज्यमंत्रिपदाची संधी

2002 मध्ये अपक्ष असतानाही दीड दिवस मंत्रिपदाची संधी

2004 मध्ये संसदीय कार्य आणि महिला बालकल्याण मंत्रिपदी वर्णी

2009 मध्ये सहकार मंत्री म्हणून काम

गेल्या दोन निवडणुकीत दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला असला तरी शरद पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत इंदापूरातून सुप्रिया सुळेंना 25 हजार मतांचं लीड मिळालंय. त्यामुळे दत्ता भरणेंची यंदाची विधानसभेची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

SCROLL FOR NEXT