Amol Mitkari on Har Har mahadev
Amol Mitkari on Har Har mahadev Saam Tv
मुंबई/पुणे

Har Har Mahadev Controversy: 'हर हर महादेव' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; आमदार मिटकरींनी घेतला मोठा आक्षेप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'हर हर महादेव' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'हर हर महादेव' चित्रपट रोजच चर्चेत असतो. या चित्रपटातील काही दृश्यांवर मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. अमोल मिटकरी यांनी नोंदवलेल्या आक्षेपामुळे राजकारण तापलं आहे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हर हर महादेव या चित्रपटामध्ये दाखवलेली दृश्य चुकीची असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी या चित्रपटात सईराणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांनी एकेरी नावाने हाक मारली यावर देखील आक्षेप घेतला आहे. आमदार मिटकरी यांनी ट्विट करत या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. (Amol Mitkari)

काय म्हणले आहेत आमदार अमोल मिटकरी ?

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर "हर हर महादेव"या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली "छ.शिवरायांची " भुमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. श्री राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते.'

'अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक व जेधे _ बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही, असेही पुढे म्हणाले. (Movie)

आमदार अमोल मिटकरींच्या या ट्विटनंतर चित्रपटच्या कथानकावर संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर टीका होत आहे तर काहीजण याचे समर्थन देखील करत आहेत. अमोल मिटकरी यांच्या आक्षेपामुळे या सिनेमावरून चांगलाच वाद पेटला आहे. सदर चित्रपट वादात अडकल्यामुळे 'हर हर महादेव' सिनेमाला किती नुकसान सहन करावे लागेल हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: या राशींच्या हातात टिकत नाही पैसा

Benifits of Ashwagandha: अश्‍वगंधा खाल्यामुळे होणारे फायदे ऐकुण व्हाल थक्क...

Lok Sabha Election Voting | मतदानासाठी लांबच लांब रांग, ठाकरे गटाचे नेते संतापले

Maharashtra Lok Sabha Voting Live: देशभरात दुपारी ३ पर्यंत पं. बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Latur Water Scarcity : लातूर जिल्ह्यातील ८ पैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे; शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

SCROLL FOR NEXT