Vaishnavi Hagawane News Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : हगवणेंचं घर की सुनांची छळछावणी? हगवणेंकडून मोठ्या सुनेचाही छळ, मयुरीनं दाखवले छळाचे पुरावे

Vaishnavi Hagawane News : वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंच्या छळछावणीचा संतापजनक प्रकार समोर आलाय... हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणेनं नेमकं काय सांगितलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येण्यास सुरुवात झालीय....हगवणेंची मोठी सून मयुरीनं माध्यमांसमोर हगवणेंच्या छळछावणीचं धक्कादायक वास्तव मांडलंय..नणंद करिश्मा, सासू लता, सासरा राजेंद्र आणि दीर शशांकच्या बेदम मारहाणीला कंटाळूनच आपण माहेर गाठल्याचं मयुरीनं सांगितलंय...

2022 मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरु झाला... सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली. त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलीसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय...लहान जाव वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणीच सांगितलीय...

हगवणेंची छळछावणी, मयुरीची कहाणी

- वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते

- नणंद, सासू, सासरे आणि वैष्णवीचा नवरा तिला मारहाण करायचे

- हुंड्यासाठी तिचा कायम छळ करायचे

- वैष्णवीचा नवरा मलाही मारायचा

- माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण

- कुटुंबातील लोकांची प्रवृत्ती माहित असल्याने नवऱ्यानं माहेरी सोडलं

हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची दखल पोलिसांनी का घेतली नाही? महिला आयोगानंही मयुरीच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता... मात्र आता उशीरानं जागं आलेल्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत..

तु पैसे दिले नाही म्हणून तुझ्या मुलीला मारुन टाकलं, अशी निर्लज्जपणे कबुली शशांक हगवणेनं दिल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय.. मात्र हगवणेंमध्ये एवढा माज कुठून आला? पोलिसांवर जानेवारीमध्ये कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT