Pune Hadapsar Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: मांजरी कुठे ठेवल्या? जागा दाखवण्यास महिलेचा नकार; ३०० मांजरी प्रकरणाचं गुढ वाढलं

Hadapsar woman 300 cats: महिलेनं सर्व मांजरी खराडी येथील मालकीच्या जागेत हलवल्याची माहिती दिलीय. मात्र, खराडीतील जागा दाखवण्यास तिने नकार दिलाय. त्यामुळे मांजरी प्रकरणातील गूढ आणखी वाढलंय.

Bhagyashree Kamble

पुण्याच्या हडपसर येथे एका सोसायटीमध्ये एका महिलेनं घरात ३००हून अधिक मांजरी पाळल्याचा प्रकार समोर होता. सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ अ‍ॅनिमल्स (एसपीसीए) आणि महापालिकेचा पशुवैद्यकीय विभागातर्फे महिलेला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर महिलेनं सर्व मांजरी खराडी येथील मालकीच्या जागेत हलवल्याची माहिती दिलीय. मात्र, खराडीतील जागा दाखवण्यास तिने नकार दिलाय. त्यामुळे मांजरी प्रकरणातील गूढ आणखी वाढलंय.

२ वर्षांपूर्वी ६० मांजरी पाळल्याबद्दल आणि त्यांची नोंदणी न केल्याबद्दल महिलेला नोटीस पाठवण्यात आली होती. महिलेनं नोटिशीला न जुमानता दोन वर्षांत आणखी मांजरींची भर घातली होती. त्यामुळं एसपीसीए आणि महापालिकेनं महिलेलं नोटीस पाठवली. यानंतर पाळीव मांजरांना खराडी येथील विशिष्ट ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर महिलेने पुठ्ठ्याच्या मोठ्या बॉक्समधून मांजरींना रात्रीच्या वेळी स्वत:च्या मालकीच्या खराडी येथील एक एकर मोकळ्या परिसरात हलवले. मात्र, तिने या जागेचे तपशील देण्यास नकार दिला आहे.एकीकडे एक ते दोन मांजरे पाळण्यासही अशक्य असताना दुसरीकडे मात्र इतक्या प्रमाणात ही मांजरे पाळण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झालाय.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी ही मांजरे पाळण्याचे नेमकं कारण काय, असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर महिलेनं त्यामागचे निश्चित कारण सांगितलं नाही. दुसरीकडे स्थलांतरित जागेची माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत महिलेला पुन्हा नोटीस दिली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT