ANDHERI DRUG BUST: DN NAGAR POLICE ARREST HABITUAL DRUG PEDDLER WITH MD WORTH ₹9.29 LAKH saam tv
मुंबई/पुणे

ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

DN Nagar Police Seize 61.95 Grams Of MD Worth Rs 9.29 Lakh: अंधेरी पश्चिमेत डी एन नगर पोलिसांची मोठी कारवाई; ६१.९५ ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच MD जप्त. सुमारे ९ लाख २९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सराईत आरोपी फरदीन शेख उर्फ मोगलीला अटक

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी पश्चिमेतील उस्मानिया डेअरीसमोरील साईबाबा सोसायटी परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने MD (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दा. नौ. नगर पोलिसांनी अटक केली. फरदीन अल्ताफ शेख उर्फ मोगली असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ६१.९५ ग्रॅम मेफेड्रोन, अंदाजे ९ लाख २९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६.४१ वाजता साईबाबा सोसायटी, उस्मानिया डेअरीसमोर, अंधेरी पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली. फरदीन शेख उर्फ मोगली आणि त्याचा साथीदार सैफल्ला अल्लाबक्ष खान यांनी संगनमत करून प्रतिबंधित अंमली पदार्थाची वाहतूक, विक्री व व्यापार करण्याच्या उद्देशाने MD जवळ बाळगल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दा. नौ. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१०/२०२६ नुसार NDPS कायद्यातील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरदीन शेख उर्फ मोगली याला १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वीही मारहाण, शस्त्र बाळगणे, NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थ बाळगणे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून समोर आले आहे. त्याचा साथीदार सैफल्ला अल्लाबक्ष खान हा सध्या पाहिजे आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन डोईफोडे, सहायक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार ऋषीकेश बाबर तसेच पोलीस शिपाई अनिल जतकर, सागर माने आणि संग्राम पात्रे यांच्या पथकाने सहभाग घेतला. रात्रपाळी पर्यवेक्षक म्हणून पोलीस निरीक्षक खोंद्रे यांनी देखरेख केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT