MAnoj Jarange- Gunratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

Gunratna Sadavarte : हेच का तुमचं शांततामय आंदोलन?, मनोज जरांगेंना तातडीने अटक करा; तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया

Maratha Andolan : 50 टक्के खुल्या वर्गासाठीचा माझा संघर्ष सुरुच राहिल.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड मराठा आंदोलनकांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांना तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र या तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे यांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वाहनांच्या घटनेचा निषेध करताना गुणरत्न सदावर्ते यांनी, हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. 50 टक्के खुल्या वर्गासाठीचा माझा संघर्ष सुरुच राहिल. मला कुणीही शांत करु शकत नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे माझी मुलगी गेल्या 8 दिवसांपासून शाळेत जात नाही. पोलिसांसमोरच माझ्या वाहनांची तोडफोड केली गेली. हल्ल्याची माहिती पोलिसांना आधीपासूनच होती, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.

कॉल, मेसेज , सोशल साईटवर मला धमक्या दिल्या जात आहेत. कितीही हल्ले झाले तरी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. मनोज जरांगे यांना तातडीने अटक करण्याची मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्टनुसार मनोज जरांगे पाटलांना अटक करा, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझी हत्या झाली तरी मी गुणवंतांसाठी लढा सुरुच ठेवणार. सरकारने फक्त मनोज जरांगेंचं ऐकू नये आमचंही ऐकावं. नाहीतर मी सुद्धा आमरण उपोषण करेन, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

हल्ल्याचे समर्थन करणार नाही- मनोज जरांगे

गुणरत्न सदावर्ते यांचे आरोप मनोज जरांगे यांनी फेटाळून लावले आहेत. मुंबईत नेमकं काय झालं माहिती नाही. मात्र सदावर्ते यांच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे.

सदावर्ते हल्ल्याबाबत कुणावरही आरोप करतील. मात्र आम्ही आंदोलन कसं करावं हे त्यांनी सांगण्याची गरज नाही. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Bar Recipe : जीममधून आल्यावर खा 'हा' प्रोटीन बार, मिळेल तुफान एनर्जी

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने ग्लॅमरस जगाला ठोकला रामराम अन् बनली संन्यासी, नेमकं झालं काय?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT