Gunratna Sadavarte  SaamTvnews
मुंबई/पुणे

Breaking : मुंबई पोलिसांकडून गुणरत्न सदावर्तेंना अटक!

सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Krushnarav Sathe

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी काहीवेळापूर्वी ताब्यात घेतले. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे दिलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. या नंतर कामगारांनी आजचे हे हिसंक आंदोलन केले त्यामुळे गुणरत्न यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर आता ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना भादंवि कलम 353, 333, 34 120 (ब) क्रिमिनल अबेटमेंट कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय देताना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, हा ६ एप्रिलला न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हिंसक पद्धतीने आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त झाल्या. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

त्यानंतर, ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांसाठी मोठी मदत, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Political News : ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT