Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte Saam Tv
मुंबई/पुणे

गुणरत्न सदावर्ते यांची थोड्याच वेळात तुरुंगातून सुटका

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस (Police) ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पवारांच्या घरावरील हल्ल्याच्याच दिवशी म्हणजेच ८ एप्रिल रोजी सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आतापर्यंत मुंबई, सातारा आणि कोल्हापूर या तीन पोलीस ठाण्यातून सदावर्ते यांच्यावर कारवाही करत सदावर्ते यांना अटक करण्यात आली.

हे देखील पाहा :

कोल्हापूर पोलिसांची कोठडी (Police Custody) काल संपल्यानंतर मुंबई मधील आर्थर रोड कारागृहात सदावर्ते यांची रवानगी करण्यात आली. पण, सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता कोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यामुळे 19 दिवसानंतर सदावर्ते जेलमधून (Jail) बाहेर येणार आहेत. त्यांना घेण्यासाठी त्यांची पत्नी जयश्री पाटील, व त्यांची मुलगी आले आहेत. सुटकेसाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सदावर्ते यांना आजची रात्र देखील तुरुंगात काढावी लागू शकते असा अंदाज व्यक्त होतोय. तसेच पुणे पोलिसांत देखील सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा नोंद होता, त्यानुसार पुणे पोलिस आज सदावर्ते यांना ताब्यात घेणार का हेही पाहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT