mns saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : गुजराती व्यक्तीने बळकवला मराठी महिलेचा गाळा, मनसे पदाधिकारी मदतीला धावले

Mumbai news : रिटा दादरकर असं या महिलेचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News :

मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका मराठी महिलेला सोसायटीत गाळा भाड्याने देण्यास गुजराती भाषिक नागरिकांनी विरोध केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. असं असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली साईनगर परिसरात एका परप्रांतीय गुजराती माणसाने मराठी महिलेच्या गाळा बळकवल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात महिला तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. रिटा दादरकर असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Political News)

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडे साईनगर परिसरात राहणाऱ्या रिटा दादरकर या ज्येष्ठ महिलेचा एक गाळा आहे. तो गाळा परमार नावाच्या व्यक्तीने काही गुंड पाठवून जबरदस्तीने तो बळकवल्याचा आरोप रिटा दादरकर यांनी केला आहे. हा गाळा 1944 पासून रिटा दादरकर यांच्या सासऱ्याच्या नावाने असून 1966 पासून त्याचे असेसमेंट टॅक्स देखील त्यांच्या सासऱ्याच्या नावानेच भरले जात आहेत.

शिवाय त्या ठिकाणी असलेला इलेक्ट्रिसिटी मीटर देखील दादरकर यांच्या मुलाच्या नावाने आहे. मात्र या गाळ्यावर परप्रांतीय गुजराती परमार याने गुंड पाठवून टाळा तोडून जबरदस्तीने गाळ्याचा कब्जा घेतला आहे.  (Latest News Update)

यासंदर्भात रिटा दादरकर यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र कांदिवली पोलिसांकडून त्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. यामुळे त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. परमारने पोलिसांना देखील सेट केल्याचा आरोप रिटा दादरकर यांनी केला आहे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही म्हणून रिटा दादरकर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली असून गुन्हा दाखल करावा यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये ठिया देखील दिला होता.

कांदिवली पोलिसांनी जर परमार विरोधात गुन्हा दाखल केला नाही आणि महिलेला न्याय मिळवून दिला नाही, तर कांदिवली पोलीस ठाण्यावर मनसे भव्य मोर्चा काढणार असल्याचे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश साळवी यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT