मुंबई: भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस (Police) आयुक्त यांनी धोरण ठरवावे असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील (Dilip Walse- Patil) यांनी सांगितले आहे की, 'पुढील १ ते २ दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येणार आहे. मुंबई (Mumbai) बरोबरच संपूर्ण राज्याकरिता अधिसूचना काढण्यात येणार आहे. यामध्ये सूचना जारी करण्यात येतील. गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई (Action) करण्यात येणार आहे.
हे देखील पहा-
राज्य सरकार यावर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये
भोंग्यावरुन (loudspeakers) राज्यभरामध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी याकरिता गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.
भोंग्याच्या मुद्यावरून राज्यामध्ये मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. शिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षपणे पालन करण्याचे आदेश दिले जाणार आहे.
सध्याची परिस्थिती बघता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहे. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर करत सामाजिक तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे ३ हजार पोस्ट डिलीट केले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.