Metro 2B extension saam tv
मुंबई/पुणे

Metro 2B extension: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! प्रवास होणार सुपरफास्ट, नवीन मेट्रो मार्ग सेवेत; कुणाला होणार फायदा?

Diamond Garden Metro: मुंबईतील मेट्रो 2B चा डायमंड गार्डन ते चेंबूर नाका विस्तारित मार्ग आणि SCLRचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंतचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. ठाणे-बोरिवली दुसऱ्या बोगद्याचे कामही सुरू झाले असून मुंबईची पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे. शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास आणखी सोपा होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडलंय. डायमंड गार्डन ते चेंबूर नाका या मेट्रो मार्गिका 2B च्या विस्तारित भागाचं, तसंच SCLR च्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणाऱ्या विस्तारित मार्गाचं काम पूर्ण होऊन हे मार्ग आता प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेत. यासोबतच ठाणे-बोरिवली दरम्यानच्या दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू करण्यासाठी अर्जुन टनेल बोरिंग मशीन (TBM) लाँच करण्यात आलंय.

मेट्रो 2B आणि SCLR विस्तार प्रवाशांसाठी खुला

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या प्रकल्पांचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अध्यक्ष एकनाथ शिंदे तसंच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं. डायमंड गार्डन ते चेंबूर नाका हा मेट्रो 2B चा विस्तारित भाग आता प्रवाशांसाठी खुला झालाय. याचबरोबर SCLR चा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंतचा विस्तार देखील सुरू झाला आहे.

दरम्यान, ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पातील दुसरा बोगदा तयार करण्यासाठी ‘अर्जुन’ TBM मशीनचं काम सुरू करण्यात आलंय. MMRDAच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांमुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम प्रवासाची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून शहरातील काही अतिवर्दळीच्या मार्गांवरील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.

मेट्रो 2B च्या या विस्तारामुळे चेंबूर परिसरातील उपनगरीय रेल्वे आणि मोनोरेल नेटवर्कशी मेट्रोची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो या तीनही सार्वजनिक वाहतूक पर्यायांमध्ये सहज प्रवास करता येणार आहे.

मुंबईत आणखी 60 ते 70 किमी मेट्रो मार्ग?

SCLRचा 1.40 किमी लांबीचा अंतिम उन्नत मार्ग भारत नगर रोड-मुंबई विद्यापीठ परिसराला वाकोला जंक्शनशी जोडतो. या मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि मुंबई विमानतळाकडे जाणारी कनेक्टिव्हिटीही सुधारण्याची अपेक्षा आहे. यामुळे आता 10.30 किमी लांबीचं संपूर्ण एकत्रित SCLR नेटवर्क सुरु झालं आहे. परिणामी कालिना, वाकोला आणि कलानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असं म्हटलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच वर्षी मुंबई महानगर प्रदेशात आणखी 60 ते 70 किमी लांबीचे मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

हे नवीन मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. त्याचा थेट फायदा रोज कामासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना होणार असून दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि वेळ वाचवणारा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणार का? भाजपच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांचे उपोषणस्थळ आणि परिसरात श्वान पथककडून पाहणी

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढचे 2 महिने ठरणार गेमचेंजर, DA 63% होणार?

एकनाथ शिंदे आता भाजपला टशन देणार, उत्तर भारताच्या मैदानात शिलेदार उतरवणार, नेत्यांना दिला कानमंत्र

SCROLL FOR NEXT