Bombay High Court delivers key verdict — grandchildren have no automatic right over grandfather’s property under Hindu law. saamtv
मुंबई/पुणे

आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेबाबत मोठा निर्णय दिलाय. आजोबांच्या मालमत्तेवर नातवंडांना जन्मसिद्ध हक्क सांगता येत नसल्याचा निकाल दिलाय.

Bharat Jadhav

  • नातवंडांना आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क सांगता येणार नाही.

  • हा निर्णय हिंदू वारसा हक्क अधिनियम २००५ च्या सुधारणेवर आधारित आहे.

  • आजोबांची संपत्ती आपोआप नातवंडांना मिळणार नाही.

कौटुंबिक संपत्तीच्या वादावरून मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. हिंदू कुटुंबात नातू किंवा नात यांना आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध अधिकार सांगता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. या निकालामुळे हिंदू वारसा हक्क अधिनियम २००५ च्या सुधारणेवर अधिक स्पष्टता मिळाली आहे. या कायद्यात संयुक्त कौटुंबिक संपत्तीत सह भागीदार म्हणून मुलींना समान अधिकार देण्यात आले होते.

कौटुंबिक संपत्तीच्या वादावरून मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिलाय. हिंदू कुटुंबात नातू किंवा नात यांना आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध अधिकार सांगता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलंय. या निकालामुळे हिंदू वारसा हक्क अधिनियम २००५ च्या सुधारणेवर अधिक स्पष्टता मिळाली आहे. या कायद्यात संयुक्त कौटुंबिक संपत्तीत सह भागीदार म्हणून मुलींना समान अधिकार देण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी विश्वंभर विरुद्ध सुनंदा या खटल्यात हा महत्त्वाचा निकाल दिला. या वादाची सुरुवात संयुक्त कुटुंबातील संपत्तीच्या वारशावरून झाली. नातीने आजोबांच्या संपत्ती वाटपात तिचीही भागीदारी असल्याचा दावा केला होता. आजोबांचे निधन झाले आहे. त्यांना ४ मुले आणि ४ मुली होत्या. ज्यातील कोर्टात गेलेल्या नातीची आई जिवंत आहे. आईने तिचा हक्का सोडलेला नव्हता असा युक्तिवाद तिने कोर्टात केला.

२००५ च्या सुधारणेनंतर मुलांप्रमाणेच मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिला जातो. त्यामुळे आईच्या वतीने आम्हालाही त्यात हक्क हवा असा दावा नातीने कोर्टात केला. या खटल्यात प्रामुख्याने मुलीची मुलगी आजोबांच्या संयुक्त संपत्तीत दावा करू शकते का असा प्रश्न उभा राहिला होता.

कोर्टाने या नातीने केलेला दावा फेटाळून लावला. नात आजोबांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी खटला दाखल करू शकत नाही. २००५ अधिनियमानुसार मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार आहेत. परंतु मुलींच्या मुलांसाठी कायद्याद्वारे असा कुठलाही अधिकार नाही. त्याशिवाय नात आजोबांच्या पुरुष वंशातील वंशज नाही.त्यामुळे संयुक्त कौटुंबिक संपत्तीत तिचा कुठलाही जन्मसिद्ध अधिकार राहत नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT