Devendra fadnavis news  Saam tv
मुंबई/पुणे

CSMT स्टेशनवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार; कधीपासून होणार कामाला सुरुवात?

Devendra fadnavis news : CSMT स्टेशनवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती हाती आलीये. ही पुतळ्याचं काम कधीपासून सुरु होणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही.

Vishal Gangurde

सीएसएमटी स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयी माहिती दिली.

लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज झाल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं

नवीन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

नागपूर : हिवाळी अधिवेशनातून महत्वाची माहिती हाती आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या सदस्यांच्या नकारावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचं स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे मुंबईतील अभिमानाचं स्थान आहे. या स्टेशनवर पुतळा उभारण्याची मागणी याआधीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः स्पष्ट केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. लोकसभेत आलेले उत्तर हे केवळ जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज निर्माण झाला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम कधीपासून सुरु होणार, याविषयी अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Election: मोठी बातमी! कुख्यात गुंड पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

Red Velvet Cake Recipe : न्यू इयर पार्टीचा केक घरीच झटपट बनवा, वाचा 'ही' अगदी सिंपल रेसिपी

Girija Oak : 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकच्या गोड आवाजावर चाहते फिदा; 'त्या' VIDEOवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Thane : मोठी बातमी! ठाणे जिल्ह्यात ED अन् ATS ची छापेमारी, मध्यरात्रीपासून झाडाझडती, अनेक घरांमध्ये...

SCROLL FOR NEXT