Kokan Gram Panchayat Election Saam TV
मुंबई/पुणे

Kokan News : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपच नंबर १ : मंत्री रविंद्र चव्हाण

राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Election) निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळालं. कोकणातील (Kokan) सर्व जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही भाजप पुन्हा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. (Gram Panchayat Election Latest News)

काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला दमदार यश मिळाले असून कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही भाजप पुन्हा एकदा नंबर वन चा पक्ष ठरला आहे. गेली अनेक वर्षे कोकण हा आमचाच बालेकिल्ला असल्याचा सातत्याने दावा करणाऱ्या शिवसेनेला या निकालामुळे चोख प्रत्युत्तर मिळालंय असं मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, 'ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच ग्रामपंचायमधील ५७४ जागांपैकी भाजपाने १९० जागांवर विजयी मिळवित आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे'.

'पंचायत ते पार्लमेंट पर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यापुढेही भाजप विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहिल. तसेच कोकणामध्ये भाजपा आता अतिशय प्रभावीपणे संघटनात्मक व राजकीयदृष्टया पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे', असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचयातीच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे दमदार यश प्राप्त झाले आहे, असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT