Govt Employee Saam TV
मुंबई/पुणे

Govt Employee Strike: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 19 लाख कर्मचारी संपावर

सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतरही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्यापासून राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी संप पुकारणार आहेत.

सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर जाणार आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

>> नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

>> कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा.

>> सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तत्काळ हटवा. (Latest News)

>> अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.

>> सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा.

>> चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करु नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा.

>> शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १०:२०:३० वर्षे व इतर) तत्काळ सोडवा.

>> निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बानगे गावात दुर्मिळ प्रकार, म्हशीला जन्मलं दोन तोंडांचं रेडकू

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरण; बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

SCROLL FOR NEXT