Mumbai News: शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईवर ५ वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं लाल वादळ धडकणार आहे. ५ वर्षांपूर्वी ज्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पायी मुंबई गाठली होती. आता पुन्हा त्याच मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्याची वेळ आलीय.
१४ मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार
शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रोश व्यक्त एल्गार पुकारला आहे. कांद्याला ६०० रुपये अनुदान, हमीभाव, वनजमिनींचा प्रश्न, कर्जमाफी यासह एकूण १४ मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. सध्या नाशिकच्या रस्त्यांवर घोंगवणार हे लाल वादळ लवकरच मुंबईत धडकणार आहे.
याआधी देखील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई गाठली होती. त्यावेळी सरकारनं दिलेली आश्वासनं केवळ आश्वासनंचं राहिल्याने आता आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकरी आरपारच्या लढाईच्या तयारीने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत.
वर्षानुवर्षे शेतकरी करत असलेल्या या मागण्या रास्त असल्याचं नेते मान्य करत असले, तरी त्या मागण्या इतक्या वर्षात का पूर्ण होऊ शकल्या नाहीत याचं उत्तर मात्र कुणीही देत नाही. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांना फक्त आश्वासन नकोय, तर ठोस निर्णय हवे आहेत. त्यामुळे किमान आता तरी सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार का? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे. (Latest Marathi News)
उद्या मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक
दरम्यान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत उद्या सरकार मुंबईत बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता मुंबईत मंत्रालय किंवा विधानभवनात ही बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मात्र सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सरकार सोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर लाँग मार्च मुंबईत धडकणार आहे. मात्र बैठकीत तोडगा निघाला तर लॉंग मार्च स्थगित करणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.