Goregaon Flyover Accident Today Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Flyover Accident : भरधाव दुचाकी पूलावरून २० फूट खाली कोसळली; पहाटेच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू

Goregaon Flyover Accident Today: गोरेगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडली. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडल्याने अपघात होऊन यात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वैभव रामदास गमरे (२८ वर्षे) आणि आनंद इंगळे (२१ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे वैभव रामदास गमरे (२८ वर्षे) आणि आनंद इंगळे (२१ वर्षे) हे दोघेही तरुण आपल्या पल्सर बाइक वरून गोरेगाव पूर्वेकडून गोरेगाव पश्चिमेकडे तीन डोंगरी पहाडी या ठिकाणी येण्यासाठी निघाले. गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या उड्डाणपूलावरून गोरेगाव एस व्ही रोड एमटीएनएल सिग्नल वरील उड्डाणपूलाच्या कठड्याला अति वेगात असलेली दुचाकी धडकली वरील नियंत्रण सुटल्याने बाईक आणि बाईक वरील दोघेही तरुण वीस फूट खोल खाली पडून गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे रात्रपाळी वरील पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन जखमी अवस्थेतील या दोघांनाही घेऊन जोगेश्वरी पूर्वेकडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात पोहोचले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी या दोघाही तरुणांना तपासून मृत घोषित केले.

या दोनही मृत तरुणांकडे असलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची संपर्क साधून त्यांचे मृतदेह वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात दिले. या दोन्ही तरुणांच्या रक्तांचे नमुने नवैद्यकीय तपासणीसाठी घेण्यात आले असून या तरुणांनी मद्य प्राशन केले होते का? यासंदर्भात गोरेगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT