Goregaon Building Fire Death Case Municipal Commissioner Iqbal Singh Chahal shocking information Saam TV
मुंबई/पुणे

Goregaon Building Fire: गोरेगाव इमारतीतील मृत्यू आगीमुळे नाहीत, तर... महापालिका आयुक्तांची धक्कादायक माहिती

Satish Daud

Goregaon Building Fire Latest Updates

मुंबईतील गोरेगाव परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. गोरेगावमधील समर्थ नावाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता या आगीने रौद्ररुप धारण करत तीन मजल्यांना विळखा घातला.

या भयानक घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली. याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. आगीची माहिती मिळताच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना एक धक्कादायक खुलासा केला.

काय म्हणाले इकबाल सिंह चहल?

"घडलेली घटना अतिशय दु:खद आहे. ही इमारत एसआरए प्रोजेक्टची असून या बिल्डिंगमध्ये वाघरी समाजाच्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात कपडे साठवण्यात आले होते. या कपड्यांना आग लागली आणि संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली", अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

"ही आग कशामुळे लागली हे अद्याप उघड झाले नाही. पण प्राथामिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. इमारतीतील लोकांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नाही. तर आगीमुळे झालेल्या धुरामुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला", अशी धक्कादायक माहिती सुद्धा इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांचा प्रत्येकी ५ लाखांची मदत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन देखील घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे माझी तेथील पोलिस, अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. मृतांच्या परिवाराला राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपुर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे देखील शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT