'पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ' SaamTV
मुंबई/पुणे

'पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ'

'15 महिने तारखा पडल्या तरी यांनी इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. राज्य मागास आयोगाचे गठन यांनी 18 महिने केले नाही. राज्य मागास आयोगाला यांनी साधी टेबल आणि खुर्ची दिली नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळावे म्हणून राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे. आणि यामुळेच आता विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवरती चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. याच आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजप आमदार गोपिचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी थेट पवार कुटुंबीयांवरतीच टीका केली, 'राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ पवार कुटूंब आहेत.' अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

हे देखील पहा -

पडळकर म्हणाले, 'काल सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निर्णय आला, OBC समाज सरकारवर नाराज आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारचा असून यांना आपले पाहुणे निवडणुकीत यांना उभे करायचे आहेत. ओबीसींसाठी आरक्षित जागा आता राहणार नाही. 346 जातींना राजकारण करण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे. राजकीय आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही, एकदा आरक्षण संपलं की यांना रान मोकळं होईल, हे कोण करतंय हे समाजाने बघायला हवे आणि सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी असं वक्तव्य पडळकर यांनी केलं.

राज्य मागास आयोगाला का पैसे दिले नाही -

15 महिने तारखा पडल्या तरी यांनी इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. राज्य मागास आयोगाचे गठन यांनी 18 महिने केले नाही. राज्य मागास आयोगाचे ऑफिस कुठे आहे? राज्य मागास आयोगाला यांनी साधी टेबल आणि खुर्ची दिली नाही. यांनी राज्य मागास आयोगाला (State Backwardness Commission) का पैसे दिले नाहीत. हे तुमच्या घरचे पैसे होते का? असे आरोप देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती (MVA Goverment) केले.

दरम्यान राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ पवार कुटूंब (Pawar Family) आहे. समितीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) कसे काय असू शकतात? पदोन्नतीच्या बाबत जे केलं तेच पवार कुटुंब आता ओबीसी समाजाच्या बाबतीत करत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT