Gopichand Padalkar : 30 जानेवारीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि याच दिवशी विविध गटातील पदवीधरांच्या परीक्षा आहेत. एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आहे. यामुळं तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. याच संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे.
पडळकरांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.
भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम 'पदवीधर' आमदार करतात. मात्र तब्बल १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पात्र लिहिली आहे.
येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट 'अ' आणि 'ब' साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत. राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार 'पदवीधर' आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह १० हजार पदवीधर मतदारांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.